बीड जिल्ह्यात आज 27 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3105 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज 27 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3105 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 2 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2062 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 27 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2035 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 9 बीड 7 केज 3 परळी 1 पाटोदा 1 शिरूर 1,असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात सध्या 310 रुग्णांवर उपचार सुरू असून काल 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे,कोरोनामुळे 3 जण दगावले आहेत बरे होण्याचे प्रमाण 97% असून 2834 बेड शिल्लक आहेत
राज्यात ३ हजार १०५ नव्या रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात शुक्रवारच्या तुलनेत आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. तसेच राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या मात्र थोडी कमी झाली आहे. मात्र, असे असले तरी आज करोना बाधित मृतांच्या सख्येत किंचित घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच कालच्या तुलनेत आज बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार १०५ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ०६३ इतकी होती. तर काल दिवसभरात एकूण ३ हजार १६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
काल राज्यात झालेल्या ५० रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ७४ हजार ८९२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के इतके झाले आहे.
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३६ हजार ३७१ इतकी आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)