आणखी दोन दिवस बीड जिल्ह्यासह या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई – राज्यात महिन्यामध्ये अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. तर राज्यातील मराठवाड्यासह नाशिक, उत्तर महाराष्ट्र या भागात गंभीर पूरस्थिती देखील निर्माण झाली होती.
तर भागांमध्ये पुढील मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर राज्यातील परभणी, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये उद्या ढगांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
तर राज्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यांमध्ये ३ ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर ४ ऑक्टोबर औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास ०६ ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गेले काही दिवस पावसाने राज्यात हाहाकार उडवला. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला
यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. दरम्यान, राज्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. राज्यात सरासरीच्या 19 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर कोकण विभागासह मराठवाड्यातही सर्वाधिक पाऊस झाला आहे
सप्टेंबरअखेरपर्यंत राज्यात सर्वच विभागांनी सरासरी ओलांडली आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने धरणात 20 टक्क्यांहून अधिक पाणीसाठ्याची भर पडली आहे. मराठवाड्यातील पाऊस सरासरीच्या तुलनेत 48 टक्के अधिक असून, कोकण विभागात तो 24 टक्क्यांनी अधिक आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात दाणादाण उडाली. याच पावसामुळे मराठवाड्याचा समावेश देशातील सर्वाधिक पावसाच्या विभागात झाला आहे.
गेल्या काही दिवासांपासून पडणाऱ्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी 2200 कोटींची गरज आहे. याबाबत प्रशासनाकडून राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 26 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. पंचनामे नकोत तर मदत करा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.