जिल्हयात अतिवृष्टी:नागरिकांनी सतर्क राहावे–जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा
जिल्हाधिकारी कार्यालय येथे २४ तास नियंत्रण कक्ष
*मदतीसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक 02442-222604 *
बीड, दि. २८:–जिल्हयात होत असलेल्या अतिवृष्टी मुळे विविध ठिकाणी आणि नदीकाठच्या गावात पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे. या भागातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे
बीड जिल्हयात 11 तालुक्यात नैसर्गिक आपत्ती मधील आपत्ती व्यवस्थापन निवारणार्थ जिल्हाधिकारी बीड येथील कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वीत केलेला आहे. त्याचा संपर्क क्र 02442-222604 असा असून मदतीसाठी जनतेने कृपया या क्रमांकाशी संपर्क साधावा. तसेच आपल्या सभोवताली निर्माण झालेल्या पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास तसेच नदीकाठी राहणार्या जनतेने सतर्क राहावे आणि पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास वरील क्रमाकांशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.
०००००००
प्रशासनाने केलेल्या मदत कार्यात बचाव पथकाने 77 व्यक्तींना वाचवले
अंबाजोगाई तालुक्यातील देवळा व आपेगाव येथे बचाव कार्य पूर्ण
केज अंबाजोगाई रोडवर वाहतुक मार्गात बदल
बीड, दि. २८:- जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने अग्निशमक दलाची पथके , महसूल , पोलिसाने विविध विभाग आणि स्थनिकांच्या सहकार्याने बचाव कार्य यशस्वी करत ७७ व्यक्तींना पूराच्या पाण्यातून बाहेर काढले आहे, यासाठी झालेल्या बचाव कार्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून बोट उपलब्ध करुन देण्यात आली होती तसेच बीड नगरपरिषदेच्या आणि लातूर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या शोध व बचाव पथकांनी सहभाग घेतला.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतात, घरांच्या छतावर आणि पुराच्या पाण्यात नागरिक अडकले. या लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम आपेगावच्या जवळ दाखल झाली असून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते, बचाव पथकाने बोटीच्या साहाय्याने १९ व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे आहेत
तसेच देवळा ता.अंबाजोगाई येथील ५८ जण मांजरा नदीच्या पुरात अडकले होते त्या सर्वांना आतापर्यंत सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलवण्यात आले असून मांजरा नदीच्या काठी पूर परिस्थितीने नुकसान झालेल्या गावांत अधिकाऱ्यांकडून निवारा भेाजन आदी उपलब्ध करुन देत मदत कार्य सुरू आहे.
पूल खचल्याने केज अंबाजोगाई रोडवर वाहतुक मार्गात बदल
केज अंबाजोगाई रोडवरील केज जवळील पूल खचला असल्यामुळे केज ते अंबाजोगाई वाहतूक बंद असून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या वाहनांनी कळंब चौकातून साळेगाव-माळेगाव-युसुफ वडगाव या मार्गे अंबाजोगाईकडे जावे.
तसेच अंबाजोगाई कडून केज, बीड, औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनांनी लोखंडी सावरगाव- बोरीसावरगाव- युसुफवडगाव-माळेगाव-साळेगाव-केज या मार्गाने पुढे जावे असे प्रशासनाच्यावतीने आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या करण्यात आले आहे.
बीड येथील १९ वर्षांचा युवक पुरात सापडल्याने मयत
बीड येथील रहिवासी शेख हा 19 वर्षाचा युवक बिंदुसरा नदीच्या पुलावरून पाणी पाहत असताना नदीमध्ये पडून पुरामध्ये मयत झाला असल्याचे प्रशासनाने कळविले आहे
बीड तालुक्यातील पिंपळनेर मंडळा मधे पाटेगाव व पिंपळादेवी या गावचे सांडव्याच्या वर 5 फुट पाणी विसर्ग होत आहे, वरील दोन्ही गावचा संपर्क तुटला आहे. गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .