बीड

पावसाचा जोर वाढला:बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो:बीड शहरातील जुन्या पुलावरून पाणी

डोकेवाडा व अन्य तलाव क्षेत्रात पावसाच्या पाण्याने जोर वाढल्याने बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरण पूर्णपणे भरले असून बिंदुसरा ओव्हर फ्लो झाले आहे

त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून शहरातून वाहणाऱ्या नदीला पूर आला आहे,जुने आणि नवीन बीडचा संपर्क तुटल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवलील नव्या पुलावरून वाहतूक वळवण्यात आली आहे पावसाचा जोर वाढत असताना शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे,

ग्रामीण भागासह शहरात देखील या पावसाचा फटका बसला आहे बीड शहरातून बिंदुसरा धरण क्षेत्रामध्ये काल रात्री झालेल्या पावसामध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, शहराला जोडणारा जुना पूल आहे आणि यावरून पाणी वाहत आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *