बीड जिल्ह्यात आज 49 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3320 तर देशात 31382 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 24 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2162 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 49 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2113 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 7 आष्टी 6 बीड 12 धारूर 1 गेवराई 5 केज 5 पाटोदा 8 शिरूर 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात काल दिवसभरात ३३२० नवीन रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यात काल दिवसभरात ३ हजार ३२० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ४ हजार ५० जणांनी दिवसभरात कोरोनावर मात केली आहे.
आजपर्यंत राज्यात ६३ लाख ५३ हजार ०२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के एवढे झाले आहे. तसेच आज राज्यात
सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात काल रोजी एकूण ३९ हजार १९१ करोना बाधित रुग्ण आहेत. तर राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ३४ हजार ५५७ झाली आहे.
देशात काल दिवसभरात 31,382 कोरोनाबाधितांची नोंद
नवी दिल्ली – देशातील कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी जवळपास तीन लाखांवर पोहोचली आहे. त्यात आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 31,382 कोरोनाबाधितांची नोंद झाली.
तर 318 बाधितांनी आपला जीव गमावला आहे. त्याचबरोबर काल दिवसभरात 32,542 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 35 लाख 94 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 46 हजार 368 बाधितांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत देशभरातील 3 कोटी 28 लाख 48 हजार नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून जवळपास तीन लाखांवर पोहोचली आहे. तर एकूण 3 लाख 162 रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)