बीड जिल्ह्यात आज 35 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3413 तर देशात 30773 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 20 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1418 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 35 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1383 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 16 बीड 6 गेवराई 4 केज 2 माजलगाव 2 परळी 1 पाटोदा 1 शिरूर 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात 3,413 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात काल 3,413 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
राज्यात आतापर्यंत 63 लाख 36 हजार 887 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.16 टक्के आहे.
राज्यात काल 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
राज्यात सध्या 42 हजार 955 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
देशात 30 हजार 773 नव्या रुग्णांची
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 30 हजार 773 नव्या रुग्णांची भर पडली असून 309 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात देशामध्ये 38 हजार 945 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी शनिवारी रुग्णसंख्येत 35 हजार 662 इतकी भर पडली होती तर 281 लोकांचा मृत्यू झाला होता. काल नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्णसंख्या एकट्या केरळमध्ये सापडली आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)