बीड

बीड जिल्ह्यात आज 60 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3391 तर देशात 35662 रुग्णांची नोंद

सहा तालुक्यात प्रत्येकी एक एकच रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 19 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2219 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 60 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2159 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 14 आष्टी 15 बीड 13,गेवराई 1 केज 12 माजलगाव 1 परळी 1 पाटोदा 1 शिरूर 1 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात 3,391 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात आज 3, 391 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

तर 3 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 28 हजार 561 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.09 टक्के आहे.

राज्यात आज 80 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
राज्यात सध्या 47 हजार 919 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

गेल्या 24 तासात देशात 35 हजार रुग्णांची भर

देशातील कोरोना ची रुग्णसंख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशातील रुग्णसंख्येत 35 हजार 662 इतकी भर पडली आहे आणि 281 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 33 हजार 798 जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल वाढलेल्या नव्या रुग्णसंख्येपैकी एकट्या केरळमध्ये 23 हजार 260 नवीन रुग्ण सापडले आहेत. केरळमध्ये काल 131 जणांचा मृत्यू झाला आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *