बीड जिल्ह्यात आज 59 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3783 तर रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज 59 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3783 तर रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2982 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 59 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2923 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 18 बीड 16, धारूर 3 गेवराई 5 केज 2 माजलगाव 4 परळी 1 पाटोदा 5 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात ३ हजार ७८३ नव्या रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात परवाच्या तुलनेत काल करोना (coronavirus) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. शिवाय मृत्यूची संख्याही वाढली आहे. तर, कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील थोडी वाढल्याने चिंताजनक आहे. तर दुसरीकडे दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ, आणि एकूण सक्रिय रुग्णसंख्येत किंचित घट झाल्याने राज्याला थोडा दिलासाही मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,काल दिवसभरात राज्यात ३ हजार ७८३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ५३० इतकी होती. तर काल दिवसभरात एकूण ४ हजार ३६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार ६८५ इतकी होती. तर, बुधवारी ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ५२ इतकी होती. (maharashtra registered 3783 new cases in a day with 4364 patients recovered and 56 deaths today)
राज्यात झालेल्या ५६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख १७ हजार ०७० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०७ टक्के इतके झाले आहे.
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ०३४ इतकी आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)