बीड जिल्ह्यात आज 48 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3623 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 12 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2035 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 48 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1987 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात आष्टी 31 बीड 8, केज 3 माजलगाव 2 पाटोदा परळी 1, पाटोदा 1 वडवणी 2 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात 55 रुग्ण कोरोनामुक्त :उपचार घेत आहेत 531 रुग्ण
बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात होऊ लागला असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील चांगली आहे काल दिवसभरात 55 रुग्णांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली असून सध्या बीड जिल्ह्यात 531 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
बीड जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 1964 पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली असून त्यापैकी 98 हजार 702 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, याचबरोबर आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात 2731 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्ह दर 3.0 % टक्के असून डेथ रेट 2.67% टक्के इतका आहे बीड जिल्ह्यात 96.80 टक्के रिकव्हरी रेट असून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय-निमशासकीय अशा 85 कोविड सेंटर मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे 3403 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे सध्या 2874 बेड रिक्त आहेत
राज्यात ३ हजार ६२३ नव्या रुग्णांचे निदान
राज्यात रविवारी ३ हजार ६२३ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे असून २ हजार ९७२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ४०० वर खाली आली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात राज्यात ३ हजार ६२३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ०५६ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण २ हजार ९७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. शुक्रवारी ही संख्या ३ हजार ०५६ इतकी होती. तर, काल ४६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ३५ इतकी होती.
राज्यात झालेल्या ४६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ०५ हजार ७८८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ४०० इतकी आहे
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)