राज्यातील 56 हजार कलावंत मानधनापासून वंचित:घोषणा झाली,पण मिळणार कसे ?
जिल्हास्तरावरील समितीकडून यादीच नाही
राज्यातील कलावंतांना 5 हजार मानधन देण्याची घोषणा झाली खरी पण हे मानधन कसे वितरित केले जाणार?यासाठी कलावंतांनी कुणाकडे अर्ज करायचे,यासाठी कोणती नियमावली असेल किंवा कलावंत निवडीचे अधिकार कुणाकडे आहेत?जिल्हास्तरावर नेमका कुणाकडे सम्पर्क साधायचा?असे एक ना अनेक प्रश्न कलावंतांनी उपस्थित केले आहेत,जर शासन 5 हजार मानधन देणार आहे तर ते नेमके कसे दिले जाणार याबाबतही अद्याप कुठली माहिती नाही,घोषणा झाली खरी पण ते मिळणार कसे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे,अनेक कीर्तनकार,वारकरी,रामयनाचार्य,भागवताचार्य आणि संगीत तसेच इतर क्षेत्रातील कलाकारांना शासनाचा लाभ कसा मिळणार हे लवकर जाहीर करून मानधन देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे
करोनाकाळात शहर व ग्रामीण भागातील कलावंत, लोककलावंत सर्वच अडचणीत आले होते. यामुळे शासनाने राज्यातील ५६ हजार कलावंतांसाठी प्रत्येकी ५ हजार आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी समिती स्थापन करत अर्ज मागवले होते. मात्र महिना लोटला तरी सांस्कृतिक संचालनालयाकडे अर्ज न पोहचल्याने कलावंत मानधनापासून वंचित आहेत.
गेल्या महिन्यात सांस्कृतिक कार्यमंर्त्यांनी ५६ हजार कलावंतांना प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन देण्याचे जाहीर केले. त्यासाठी लोककलावंतांची यादी तयार करण्यासाठी संचालनालय स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आपापल्या जिल्ह्यातील लोककलावंतांचे अर्ज मागवून ती यादी संचालनालयाकडे देणे अपेक्षित होते. मात्र गेल्या महिनाभरापासून यादी संचालनालयाकडे आली नसल्याची माहिती समोर आली आहे
राज्यातील विविध कलावंतांची नोंदणी करण्याची मागणी आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. आता त्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत ही जिल्हास्तरावर दिली जाणार आहे.
त्यामुळे त्या-त्या जिल्ह्यातील कलावंतांची यादी जिल्हाधिकारी किंवा सांस्कृतिक विभागाकडे असणे गरजेचे आहे. मात्र कलावंतांची यादी तयार झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
करोनाच्या काळात कलावंतांना मानधन देण्याची योजना जाहीर झाल्यानंतर मानधन समिती स्थापन करण्यात आली. समितीकडून लोककलावंतांची यादी तयार केली जात असताना ती संचालनालयाकडे आली नाही. जिल्हाधिकाऱ्यामार्फत संचालनालयाकडे यादी येत असल्यामुळे ती आल्यावर मुंबईला संचालनालयाला पाठवण्यात येणार असल्याचे संदीप शेंडे, कार्यक्रम अधिकारी,सांस्कृतिक संचालनालय म्हणाले तर
लोककलावंतांच्या जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत संचालनालय स्तरावर करोना जाणीव जागृती अभियान कलावंत निवड समिती स्थापन केल्यानंतर आमच्याकडे काही नावे आली आहेत. अनेकांचे दूरध्वनी आले असून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे नावे देण्यास सांगितले आहे. आमच्याकडे जी नावे आली ती आम्ही लवकरच संचालनालयाकडे पाठवू असे प्रमोद मुनघाटे, समिती सदस्य यांनी सांगितले आहे