बीड

बीड जिल्ह्यात 33 महसूल मंडळात अतिवृष्टी:ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट नुकसान भरपाई द्यावी-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्याला गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपले.अतिवृष्टीमुळे 33 मंडळात शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट मदत देण्यात यावी यासाठी आपण तात्काळ शासनाकडे मागणी करत आहोत असे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले

बीड जिल्ह्यात जोरदार पावसाने सात तालुक्याात हाहाकार माजला आहे. या सात तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

नद्या पुन्हा एकदा तुडूंब भरून वाहू लागल्या आहेत. लघु आणि मध्यम प्रकल्पाला भरती आली आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. सिंदफणा, मण़कर्णिका नदीलाही पूर आला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 69.7 मि.मी.इतक्या पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 63 पैकी 33 मंडळात अतिवृष्टी झाली आहे.


बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, अंबाजोगाई, केज, शिरूर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. या सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे यात 6 जणांचा मृत्यू झाला असून,29 पशुधन दगावले आहेत,तर 20 ठिकाणी घरांची पडझड झाली आहे,याच बरोबर शहरी आणि ग्रामीण भागातील रस्ते वाहून गेले आहेत,अनेक ठिकाणी पूल वाहून गेले आहेत तसेच बीड तालुक्यात शिवणी, खटकळी, लोकरवाडी, वडगाव भंडारवाडी, ईट, जुजगव्हाण, मन्यारवाडी, मणकर्णिका, तसेच विभागातील ३२ प्रकल्पही ओव्हरफ्लो झाले आहेत तलाव फुटून अनेक ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले असून शासनाने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट मदत जाहीर करावी तसेच पीक विमा कंपनीकडून तात्काळ विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्याची सूचना करावी यासाठी आपण शासनकडे मागणी करणार असल्याचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *