बीड जिल्ह्यात आज फक्त 38 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3626 तर देशात 38948 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 7 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2900 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 38 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2862 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 13 बीड 8 धारूर 1 गेवराई 2,केज 5 माजलगाव 1 शिरूर 2 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्याला मोठा दिलासा ३ हजार ६२६ नव्या रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी करोना (coronavirus) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. विशेषत: दैनंदिन मृत्यू देखील बऱ्यापैकी घटले आहेत. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील किंचित वाढ झाली आहे. तसेच रविवारच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात राज्यात ३ हजार ६२६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. परवा ही संख्या ४ हजार ०५७ इतकी होती. तर दिवसभरात एकूण ५ हजार ९८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.परवा ही संख्या ५ हजार ९१६ इतकी होती. तर, काल ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. परवा ही संख्या ६७ इतकी होती. (maharashtra registered 3626 new cases in a day with 5988 patients recovered and 37 deaths today)
सोमवारी राज्यात झालेल्या ३७ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ७५५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४७ हजार ६९५ वर आली आहे.
देशात 24 तासांत 38,948 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 38,948 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 219 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 43,903 रुग्ण कोरोनावर मात करुन कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात सलग पाच दिवस 40 हजारांहून कोरोनाबाधितांची नोंद केली जात होती. मंगळवारी 41965, बुधवारी 47092, गुरुवारी 45352, शुक्रवारी 42618, शनिवारी 42766 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 30 लाख 27 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 40 हजार 752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिलासादायक बाब म्हणजे, 3 कोटी 21 लाख 81 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून अधिक आहे.
एकूण 4 लाख 4 हजार 874 रुग्ण अद्याप कोरोनाशी झुंज देत आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)