बीड

बीड जिल्ह्यात साधेपणाने आणि शांततेत गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन

बीड, दि. ६ :- गणेशोत्सव १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा होणार असून या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी राधा‍बिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा‍धिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झाली.

यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पूर्ण कमी झालेली नसून या पाश्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन साधेपणाने गणेशोत्सव साजरा होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले,

जिल्ह्यात गणेशोत्सव कालावधीत अनुचित प्रकार न घडता, गर्दी न करता,  शांततेच्या वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात यावा, उत्सव का्ळात ध्वनिप्रदुषण होणार नाही, रुग्‌ण, वयोवृध्द आजारी व्यक्ती, हॉस्पीटल परिसरात याचा त्रास होणर नाही याची देखील काळजी घेतली जावी असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक आर राजा यांनी केले.

 बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी मच्दिंद्र सुकटे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलिस अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, शांतता समितीचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुकटे यांनी सांगितले की राज्य शासनाने दिलेल्या निर्देश आणि जिल्हाधिकारी यांचे परिपत्रकानुसार यापूर्वी सर्व संबंधित विभाग आणि गणेश मंडळे यांना माहिती कळवण्यात आले आहे, कोरोनाचे निर्बंध अजूनही लागू असून मिरवणूका  काढणे,  गर्दी करण्यास बंधने आहेत,  सार्वजनिक गणेशाच्या मुर्तीची उंची ४ फूट आणि घरगुती गणेशाची मुर्ती जास्तीत जास्त २ फूट उंच असणे गरजेचे आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे अथवा मातीच्या – शाडूच्या मुर्तींचे घरीच कुंडीमध्ये विसर्जन करणे, ध्वनि प्रदुषण, जल प्रदुषण टाळावे असे सांगितले,

यावेळी तालुका व गाव स्तरावर शांतत्या समित्या स्थापन केल्या जाव्यात, गणेश मंडळांच्या बैठका घेण्यात याव्यात, समाज माध्यमातून अफवा पसरु नये याची काळजी घ्यावी, नगरपालिकांमार्फत मुख्यधिकारी यांनी स्वच्छता मोहिम राबवावी तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि पोलिस अधिकारी यांच्यास्तरावर बैठका घेण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या,

याप्रसंगी श्री, शफिक शेख, श्री,महेश धांडे, श्री,किशन चव्हाण, श्री, गणेश सवई यासह शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी आदींनी देखील आपली मनोगत व्यक्त केली,   यावेळी स्तब्दता पाळून कोरोना काळात जीव गमावलेल्या व्यक्ती आणि कोरोना योद्धांना  श्रध्दांजली अर्पण करुन बैठक संपली,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *