बीड

बिंदुसरा धरण ओवरफ्लो नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

बीड- गेल्या तीन ते चार दिवसापासून सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तलाव जवळपास भरले असून माजलगाव धरण 100% भरून पूर्णपणे वाहत आहे माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडले असून त्यापाठोपाठ आता बिंदुसरा धरणाच्या पाण्याची पातळी ही वाढले असून हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे

माजलगाव धारण

बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण आज सकाळी 100% भरले असुन ते ओव्हरफ्लो झाले आहे.हे पाणी बिंदुसरा नदीपाञात येत आहे,या पाणीपातळीत केव्हाही वाढ होऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या व पुररेषेतील सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी ही असे आवाहन नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *