बीड

बीड जिल्ह्यात आज 79 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4355 तर देशात 41965 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 1 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4028 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 79 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3949 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 29 बीड 21 धारूर 2 गेवराई 2 केज 7 माजलगाव 3 पाटोदा 6 शिरूर 1,वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत

२४ तासांत राज्यात ४ हजार १९६ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात करोना (Coronavirus) बाधितांच्या मृत्यूंच्या संख्येत काहीशी वाढ झालेली असली असली तरी गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांची संख्या ४ हजार ते ५ हजारांच्या आसपास फिरताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात राज्यात ४ हजार १९६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी संख्या ३ हजार ७४१ इतकी होती. तर काल दिवसभरात एकूण ४ हजार ६८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ४ हजार ६९६ इतकी होती. तर, आज १०४ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ५२ इतकी होती. कालच्या तुलनेच नवे रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत वाढ होऊन बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने चिंतेत भर पडली आहे. (maharashtra registered 4196 new cases in a day with 4688 patients recovered and 104 deaths today)
राज्यात झालेल्या १०४ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ७२ हजार ८०० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५१ हजार २३८ वर आली आहे.

Corona Update:देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार नव्या करोना रुग्णांची भर

देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार ९६५ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे, देशात सद्यस्थितीत करोनावर उपचार घेणाऱ्यांचा एकूण आकडा ३ लाख ७८ हजार १८१ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे याच २४ तासांत देशात ३३ हजार ९६४ जण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ३ कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ वर पोहोचली आहे. दरम्यान, या एका दिवसातील नव्या करोना रुग्णांचा आकडा हा करोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी २८ लाख १० हजार ८४५ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी, ३ कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ इतके रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत देशात ४६० इतक्या लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे, देशातील करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा आता थेट ४ लाख ३९ हजार २० वर पोहोचला आहे. त्यामुळे, निश्चितच करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *