बीड

बीड जिल्ह्यात दोन दिवसात कोरोनाने 6 जण दगावले :1036 ऍक्टिव्ह रुग्ण

बीड-जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 655 इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाली होती त्यात 96919 जण कोरोनातून मुक्ती झाले,जिल्ह्यात आतापर्यंत 2700 लोकांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा डेथ रेट 2.68 %आहे तर पॉझिटिव्ह रेट 11.26 % इतका आहे रिकव्हरी रेट 96.28 % इतका आहे,आज दि 23 रोजी 121 जणांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे,तर दोन दिवसात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे

बीड जिल्ह्यात जवळपास 4373 खाटांची व्यवस्था आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे,जिल्ह्यातील 94 ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था असून 3588 बेड सध्या शिल्लक आहेत, दोन दिवसात 6 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे असे आरोग्य विभागाने कळवले आहे

सध्या कोरोना बाधितांचे प्रमाण बीड जिल्ह्यात आटोक्यात येत असले तरी लोक बिनधास्त पणे नियम न पाळता वावरत आहेत,बिना मास्क फिरणाऱ्याची संख्या अधिक वाढू लागली असून कोरोना गायब झाल्याच्या अविर्भावात रस्त्याने नागरिक फिरत आहेत,ही बाब अशीच राहिली तर पुन्हा एकदा कोरोना रुग्णात वाढ होऊ शकते,शासनाने सर्व व्यवहार सुरू करण्याचे प्रयत्न केले असताना नागरिकांनी नियम पाळणे गरजेचे आहे,बाजारात कसलेही सोशल डीस्टंसिंग पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे,तर अजूनही अनेक नागरिकांनी लसीकरण करून घेतलेले नाही,प्रत्येकाने लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले जात आहे,लसीकरण करून कोरोनाचा धोका टाळता येतो,हे रोजच्या कमी होणाऱ्या आकडेवारीवरून लक्षात घेण्यासारखे आहे,नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून आपण आणि आपले कुटुंबीय सुरक्षित ठेवावे असे आवाहन करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *