केंद्रीयमंत्री नारायण राणेंना दिलासा;महाड कोर्टाकडून जामीन मंजूर
महाड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्य केल्या प्रकरणी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघालं होतं. मात्र राणे यांना अखेर महाड न्यायालयाने दिलासा दिसा असून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
राणे यांना आज महाड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दिवसभराच्या ड्राम्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अवघ्या महाराष्ट्राच लक्ष महाड न्यायालयाकडे लागलं होतं.
दरम्यान दुपारी राणे यांची तब्येत बिघडली होती. त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी पथकाने त्यांची तपासणी केली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.