बीड

बीड जिल्ह्यात आज 92 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3643 तर देशात 25072 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 24 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3754 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 92 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3662 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 38 बीड 13 धारूर 2 गेवराई 4 केज 13 माजलगाव 5 पाटोदा 5 शिरूर 7 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ३ हजार ६४३ नवीन करोनाबाधित

राज्यात आज दिवसभरात ६ हजार ७९५ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ३ हजार ६४३ नवीन करोनाबाधित आढळून आले. तर, १०५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,३८,७९४ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९७.५ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा झाला आहे.
राज्यात आज रोजी एकूण ४९,९२४ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

Corona Update : देशात गेल्या २४ तासांत २५ हजार नवे रुग्ण

देशात गेल्या २४ तासांत २५ हजार ७२ करोनाबाधित आढळले असून ३८९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, ४४ हजार १५७ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २४ लाख ४९ हजार ३०६वर पोहोचली असून आतापर्यंत ३ कोटी १६ लाख ८० हजार ६२६ रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या ३ लाख ३३ हजार ९२४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही रुग्णसंख्या गेल्या १५५ दिवसांत सर्वात कमी आहे.
दरम्यान, देशातील रिकव्हरी रेट ९७.६३ टक्क्यांवर असून विकली पॉझिटीव्हीटी रेट १.९१ टक्क्यांवर आहे. तर डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्क्यांवर आहे. आतापर्यंत एकूण ४ लाख ३४ हजार ७५६ जणांचा मृत्यू झाला आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *