बीड

बीड जिल्ह्यात आज फक्त 55 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4141 तर देशात 30948 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 23 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4164 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 55 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4109 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 7 आष्टी 10 बीड 20 धारूर 4 गेवराई 1 केज 2 माजलगाव 1 पाटोदा 3 शिरूर 2 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ४ हजार १४१ नवीन कोरोना रुग्ण

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी धोका मात्र टळलेला नाही. राज्यात आज ४ हजार १४१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १४५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज राज्यात ४ हजार ७८० कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आजपर्यंत राज्यात ६२ लाख ३१ हजार ९९९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ५३ हजार १८२ बाधित रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी २२लाख ९२हजार १३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४लाख २४ हजार ६५१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत

देशात 24 तासांत 30,948 नवे कोरोना रूग्ण

भारतामध्ये मागील 24 तासांत 30,948 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 403 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.

दिवसभरात 403 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 4 लाख 34 हजार 367 वर गेला आहे. केरळात आठ दिवसांनंतर दिलासा मिळाला असून 17 हजार नवे रुग्ण आढळले असून 83 जणांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत देशात 50 कोटी 62 लाख 56 हजार 239 नमुन्यांची तपासणी झाली आहे. यापैकी 15 लाख 85 हजार 681 नमुन्यांची दिवसभरात तपासणी केली गेली आहे. देशभरातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली, तरीदेखील दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. देशातील एकूण बाधितांचा आकडा 3 कोटी 24 लाख 24 हजार 234 वर गेला आहे. आतापर्यंत 3 कोटी 16 लाख 36 हजार 469 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आजपर्यंत 58 कोटी 14 लाख 89 हजार 377 जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी 52 लाख 23 हजार 612 जणांचे 24 तासांत लसीकरण झाले आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *