पीएफधारकांना e-Nomination करण्याचं आवाहन:EPF/EPS Nomination Digitally कसे कराल?
देशभरातील नोकरदारांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. नुकतीच EPFO कडून पीएफ धारकांना नोटीस देत एक आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी पीएफधारकांना e-Nomination करण्याचं आवाहन केले आहे.
यामुळे अकाऊंट धारकांच्या फॅमिलीची सुरक्षितता राखली जाणार आहे. ईपीएफओ ने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरून त्याची माहिती दिली आहे. त्यामध्ये दिलेला व्हिडिओ पाहून तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस पूर्ण करू शकता.
यंदा जून महिन्यात EDLI स्कीम अंतर्गत फायदा नोकरदार्यांसाठी 7 लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे. EDLI हे आता नोकरदारांना insurance cover साठी बंधनकारक केले आहे. या स्कीम मध्ये जर नोकरदार व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना 7 लाखांची मदत मिळू शकते. किमान डेथ इंश्युरंस 2 लाख आहे. तर अप्पर लिमिट 6 लाख होता पण आता तो 2.5 लाख ते 7 लाख असा वाढण्यात आला आहे.
EPF/EPS Nomination Digitally कसे कराल?
ईपीएफओ च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
‘सर्व्हिस’ पर्यायावर क्लिक करा.
‘For Employees’ वर क्लिक करा.
तुम्ही ज्या विंडो वर रिडिरेक्ट व्हाल तेथे ‘Member UAN/Online Service’ निवडा.
आता तुम्ही अधिकृत Member e-SEWA portal वर रिडिरेक्ट व्हाल. येथे तुम्हांला लॉगिंग करावं लागणार आहे. इथे तुम्हाला UAN, password आणि captcha code द्यावा लागेल.
तुम्ही पोर्टल वर आल्यानंतर ड्रॉप डाऊन मेन्यू मध्ये ‘Manage’वर जा. आता E-Nominationवर क्लिक करा.
फॅमिली डिक्लरेशन करण्यासाठी ‘Yes’चा पर्याय निवडा.
आता ‘Add Family Details’वर क्लिक करा.
‘Nomination Details’निवडा. म्हणजे तुम्ही अमाऊंट शेअर निवडू शकाल.
तुमची सारी माहिती अपडेट केल्यानंतर ‘Save EPF Nomination’चा पर्याय निवडा.
पुढच्य पानावर गेल्यानंतर ‘E-sign’ चा पर्याय निवडा. याद्वारा एक ओटीपी जनरेट केला जाईल. हा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर पाठवला जाईल.
आता मोबाईल वर आलेला ओटीपी टाका.
श्रम मंत्रालयाच्या माहितीनुसार, रजिस्टर किंवा नॉमिनेटेड फॅमिली मेंबरला 2 वर्षांसाठी अॅव्हरेज डेलि वेजेसच्या 90% रक्कम मिळणार आहे.