बीड

बीड जिल्ह्यात आज फक्त 107 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4145 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 17 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4617 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 107 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4510 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 23 बीड 24 धारूर 5 गेवराई 3 केज 19 माजलगाव 1 परळी 1 पाटोदा 10 शिरूर 6 वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले आहेत

मोठा दिलासा:राज्यात ४ हजार १४५ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून मृत्यूंची संख्याही घटली आहे. तसेच, बरे होणाऱ्या रुग्णाची संख्याही वाढली असून राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याने हा राज्याला मोठा दिलासा असल्याचे मानले जात आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सोमवारी दिवसभरात एकूण १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात ४ हजार १४५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच एकूण ५ हजार ८११ इतके रुग्ण बरे झाले आहेत. (maharashtra registered 4145 new cases in a day with 5811 patients recovered and 100 deaths today) राज्यात झालेल्या १०० रुग्णांच्या मृत्यूंनंतरही राज्याचा मृत्यूदर मात्र २.११ टक्क्यांवरच आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ९५ हजार ७४४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६२ हजार ४५२ वर आली आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *