बीड जिल्ह्यात 124 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 5787 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 15 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5924 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 124 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5800 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 50 बीड 15 धारूर 5 गेवराई 3 केज 6 माजलगाव 5 परळी 2 पाटोदा 20 शिरूर 4 वडवणी 12असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात ५ हजार ७८७ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यातील दैनंदिन करोना बाधितांच्या रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत शनिवारी घट झाली असून मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. यामुळे राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात दिवसभरात एकूण १३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ही संख्या १५८ इतकी होती. तसेच दिवसभरात ५ हजार ७८७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल मात्र ही संख्या ६,६८६ इतकी होती. तसेच एकूण ५ हजार ३५२ इतके रुग्ण बरे झाले आहेत. (maharashtra registered 5787 new cases in a day with 5352 patients recovered and 134 deaths today)
शनिवारी राज्यात झालेल्या १३४ रुग्णांच्या मृत्यूंनंतरही राज्याचा मृत्यूदर आता २.११ टक्क्यांवरच आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ८६ हजार २२३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६३ हजार २६२ इतकी आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)