बीड

बीड जिल्ह्यात 154 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 5560 तर देशात 38353 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 12 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 6590 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 154 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 6436 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 56 बीड 16 धारूर 8 गेवराई 12 केज 11 माजलगाव 7 पाटोदा 16 शिरूर 16 वडवणी 9 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ५ हजार ५६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ५६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १६३ जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. तसेच आज एकूण ६ हजार ९४४ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,६६,६२० करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८२ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६३,६९,००२ झाली आहे. तर सध्या राज्यातील मृत्यू दर २.१ टक्के एवढा आहे.

राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले आणखी २० रुग्ण आज आढळले असून डेल्टा प्लस बाधित एकूण रुग्णांची संख्या आता ६५ वर पोहचली आहे. नव्याने आढळलेल्या २० रुग्णांपैकी मुंबई येथे ७, पुणे येथे ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर येथे प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

देशात 24 तासांमध्ये 38,353 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली – एका दिवसाचा दिलासा मिळाल्यानंतर कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 38,353 नवे कोरोना रुग्ण समोर आले. तर 497 संक्रमितांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर, देशभरात गेल्या 24 तासांत 40013 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच सक्रिय रुग्ण संख्या 2,157 ने कमी झाली आहे. सध्या, देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 3,86,351 एवढी आहे. ही संख्या गेल्या 140 दिवसांनंतरची सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. तर रिकव्हरी रेट 97.45%पर्यंत पोहोचला आहे. (India Coronavirus Updates active case load currently lowest in 140 days)

एकूण कोरोना संक्रमित –
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत देशात एकूण तीन कोटी 20 लाख 36 हजार लोकांना संसर्ग झाला आहे.
तर यांपैकी 4 लाख 29 हजार 179 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 12 लाख 20 हजार लोक बरेही झाले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या आता चार लाखांपेक्षा कमी झाली आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *