ऑनलाइन वृत्तसेवामुंबईवृत्तसेवा

राज्यातील हॉटेलचालकांसह विविध घटकांना मोठा दिलासा:15 ऑगस्टपासून अंमलबजावणी

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील हॉटेलचालकांसह विविध घटकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकराने राज्यातील हॉटेल्स चालकांना वेळ वाढवून दिली आहे. यासह मॉल्स आणि हॉल्सही 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तसेच जीम्सही सुरु करण्यात येणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची घोषणा केली. सह्याद्री अतिथीगृहामध्ये ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. या निर्णयाची अंमलबजावणी ही 15 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर जीम्स, मॉल्स बंद ठेवण्यात आल्या होत्या

सध्या राज्यातील हॉटेल दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र ही वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरच सरकारने हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली असल्याची माहिती आहे.

हॉटेलचालकांना वेळेत सूट

या आधी सरकारने हॉटेलचालकांना 50 टक्के क्षमतेने दुपारी 3 वाजेपर्यंत हॉटेल्स सुरु ठेवण्याची परवानगी दिली होती. तर त्यानंतर केवळ पार्सल सेवेसाठीच मुभा देण्यात आली होती. दरम्यान आता हॉटेलचालकांना रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल्स सुरु ठेवता येणार आहे. सरकारने निर्बंधातून सूट दिल्याने हॉटेलचालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले असावेत.

जीमलाही परवानगी

राज्य सरकारने व्यायामशाळा सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र यासह सरकारने 50 टक्के क्षमतेची अट घातली आहे. निर्बंध शिथिल करताना राज्य सरकारने कोरोना नियमांचे तसेच घालून देण्यात आलेल्या नियमांचं सक्तीने पालन करण्याचे आवाहनही केलंय. नियमाचं पालन न करणारे शिक्षेस पात्र असतील, असंही सरकारच्या वतीने राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

विवाह सोहळ्याच्या क्षमतेत वाढ

आतापर्यंत विवाहाला केवळ 50 जणांनाच परवागनी होती. यामध्येही सूट देण्यात आली आहे. 50 जणांचा आकडा हा 200 पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे 200 जणांना लग्नाला उपस्थित राहता येणार आहे. 200 जणांची परवानगी फक्त खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाह सोहळ्यालाच देण्यात आली आहे. तर बंदिस्त सभागृहात होणाऱ्या लग्न सोहळ्यात हॉलच्या 50 टक्के तसेच 100 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे.

खासगी कार्यलय ’24 तास’

खासगी कार्यालयं आता 24 तास सुरु ठेवता येणार आहे. कार्यालयं 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आल्याने शिफ्टमध्ये काम करता येणार आहे.

धार्मिक स्थळ आणि थेटर सुरु की बंद?

एका बाजूला सरकारने बऱ्याच घटकांना निर्बंधांमधून सूट दिली आहे. मात्र दुसऱ्य बाजूला नाट्यगृह, थेटर्स आणि धार्मिक स्थळं ही बंदच असणार आहेत. त्यामुळे कलाकारांमध्ये काहीसा नाराजीचा सुर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *