बीड

बीड जिल्ह्यात आज 151 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात बाधितांचे प्रमाण कमी झाले

बीड जिल्ह्यात आज दि 7 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4019 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 151 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3868 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 6 आष्टी 34 बीड 51 धारूर 5 गेवराई 9 केज 11 माजलगाव 6 परळी 1 पाटोदा 13 शिरूर 4 वडवणी 11 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्याला मोठा दिलासा; दैनंदिन करोना बाधित रुग्णसंख्येत घट

राज्यात आज ५ हजार ५३९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे असून ५ हजार ८५९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यातील एकूण अॅक्टिव्ह करोना बाधित रुग्णांची संख्या ७४ हजार ४८३ इतकी झाली आहे.

करोनाच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असून राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ५ हजार ५३९ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ५ हजार ८५९ इतके रुग्ण बरे झाले आहेत. आज दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असली तरी मृत्यूंची संख्या चिंता कायम राखणारी आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आज दिवसभरात एकूण १८७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 5539 new cases in a day with 5859 patients recovered and 187 deaths today)
आज राज्यात झालेल्या १८७ रुग्णांच्या मृत्यूंनंतरही मृत्यूदर मात्र गेल्या काही दिवसांपासून २.०१ टक्क्यांवरच स्थिरावला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ३० हजार १३७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्क्यांवरच स्थिरावले आहे.
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७४ हजार ४८३ इतकी आहे.

भारतात 42 हजार 982 नव्या रुग्णांची नोंद

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत अल्पशी वाढ झाली. कालच्या दिवसात 42 हजार 982 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 533 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 982 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 533 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 41 हजार 726 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 18 लाख 12 हजार 114 वर गेला आहे.
देशात आतापर्यंत 3 कोटी 9 लाख 74 हजार 748 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 26 हजार 290 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 11 हजार 76 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *