बीड जिल्ह्याची चिंता वाढू लागली:आज 212 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 6695 तर देशात 44643 बाधीत
बीड जिल्ह्यात आज दि 6 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4822 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 212 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4610 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 52 बीड 49 धारूर 6 गेवराई 13 केज 6 माजलगाव 19 परळी 2 पाटोदा 18 शिरूर 19 वडवणी 23 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात २४ तासांमध्ये ६ हजार ६९५ नवे करोनाबाधित
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 6 हजार 695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 17 हजार 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे.
राज्यात आज 120 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 % एवढा आहे.
आजच्या नव्या बाधितांमुळे राज्यात आजपर्यंत करोनाची लागण झालेल्या व्यक्तींची एकूण संख्या ६३ लाख ३६ हजार २२० इतकी झाली आहे. मात्र, यात आजघडीला फक्त ७४ हजार ९९५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
पुन्हा चिंता:देशात 44,643 नवीन रूग्णवाढ
देशात कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पुन्हा एकदा चिंता वाढवत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये, देशात कोरोनाव्हायरसची 44,643 नवीन प्रकरणे नोंदली गेली, 41,096 लोक बरे झाले आणि 464 लोकांचा या साथीमुळे मृत्यू झाला.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, देशात आतापर्यंत एकूण 3,18,56,754 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 3,10,15,844 लोक निरोगी झाले आहेत. 426754 लोकांचा मृत्यू झाला आणि 4,14,159 लोकांवर उपचार सुरू आहेत. देशात सक्रिय प्रकरणांचा दर 1.30 टक्क्यांवर आला आहे, बरे होण्याचा
दर वाढून 97.36 टक्के झाला आहे आणि मृत्यू दर 1.34 टक्के आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)