बीड जिल्ह्यात आज 194 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 6126 तर देशात 42982 बाधीत
बीड जिल्ह्यात आज दि 5 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4712 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 194 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4518 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 54 बीड 43 धारूर 12 गेवराई 7 केज 15 माजलगाव 7 परळी 1 पाटोदा 36 शिरूर 4 वडवणी 11 असे रुग्ण आढळून आले आहेत
महाराष्ट्रात काल दिवसभरात 6126 नवीन कोरोनाबाधित
महाराष्ट्रात काल दिवसभरात 6126 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 436 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 17 हजार 560 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.69 टक्के झाले आहे.
राज्यात काल दिवसभरात कोरोनामुळे 195 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 72 हजार 810 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
गेल्या 24 तासांत 42,982 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव भारतात कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. दरदिवशी 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद देशात केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 42,982 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 533 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या देशातील अनेक राज्यांत कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून केरळात प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. केरळात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 22,414 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 41,726 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)