बीड

बीड जिल्ह्यात आज 181 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 6005 तर देशात 42625 बाधीत

बीड जिल्ह्यात आज दि 4 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4868 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 181 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4687 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 55 बीड 51 धारूर 4 गेवराई 13 केज 10 माजलगाव 6 पाटोदा 15 शिरूर 14 वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले आहेत

दिवसभरात ६ हजारावर नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असली तरी दैनंदिन रुग्णसंख्या अजूनही अपेक्षित प्रमाणात कमी झालेली नाही. राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ५ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर त्याचवेळी ६ हजार ७९९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. करोनाने आज आणखी १७७ रुग्ण दगावले असून राज्यातील मृत्यूदर सध्या २.१ टक्के इतका आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Updates )

अशी आहे राज्यातील आजची स्थिती

  • राज्यात आज १७७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू
  • सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.१ % एवढा.
  • दिवसभरात राज्यात ६,००५ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ६,७९९ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी
  • आजपर्यंत एकूण ६१,१०,१२४ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ % एवढे.
  • राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७४ हजार ३१८ इतकी.

देशात गेल्या २४ तासांत ४२,६२५ नवीन करोना रुग्ण

करोनाची दुसरी लाट अजून संपली नसल्याचे काल आरोग्यमंत्रालयाने सांगितले. देशात काही राज्यात करोना वाढतोय. त्यांमुळे करोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. देशात गेल्या २४ तासांत ४२,६२५ नवीन करोना रुग्ण आढळले. तर ३६,६६८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत देशभरात एकूण ३,०९,३३,०२२ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात रिकव्हरी रेट ९७.३७ टक्के आहे. गेल्या २४ तासात ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात सध्या करोनाची ४,१०,३५३ सक्रिय रुग्ण आहेत.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *