महाराष्ट्रमुंबई

नगरपालिका कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे करोना विमा कवच:राज्य शासनाचा निर्णय

मुंबई : राज्यातील क व ड वर्ग महापालिका तसेच नगरपंचायती व नगर परिषदा यामधील करोना कर्तव्य पार पाडताना मरण पावलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा  निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
अ आणि ब वर्ग महानगरपालिका वगळता इतर सर्व महानगपालिका तसेच सर्व नगर परिषदा व नगर पंचायती यांना ही योजना लागू राहील. त्याचप्रमाणे सफाई कर्मचारी, कंत्राटी व मानधन तत्त्चावरील बाह्य़स्त्रोत कर्मचाऱ्यांचा देखील यात समावेश करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *