बीड

बीड जिल्ह्यात आज 200 पार पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 6269 तर देशात 39097 बाधीत

बीड जिल्ह्यात आज दि 25 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4513 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 208 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4305 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 37 बीड 55 धारूर 8 गेवराई 13 केज 13 माजलगाव 7 पाटोदा 27 शिरूर 37 वडवणी 8 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ६ हजार २६९ नवीन करोनाबाधित

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी कमी होताना दिसत असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असतानाच, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबतही सतर्क केले जात आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्यी ही कधी करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ७ हजार ३३२ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ६ हजार २६९ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय, आज २२४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,२९,८१७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

देशात बधितांची संख्या वाढली

देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आज देशातील नव्या बाधितांच्या संख्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशासमोरील चिंतेत अधिक भर पडली आहे. शनिवारी २४ तासांत देशात ३९, ०९७ नवे बाधित रुग्ण आढळले होते तर ५४६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र आज रविवारी कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या २४ तासात ३९,७४२ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे तर ५३५ जणांनी आपला जीव कोरोनामुळे गमावल्याचे समोर आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असून ३९ हजार ९७२ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३९ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळले असून ५३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
तर ३९ हजार ९७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १३ लाख ७१ हजारांवर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख २० हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे ३ कोटी ५ लाख ४३ हजार १३८ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ४ लाख ८ हजार २१२ जणांवर उपचार सुरू आहेत.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *