सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील नियमात बदल
मुंबई: खासगी कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. नुकतंच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनसंदर्भातील नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. सरकारी नोकरी करणारा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला मदत मिळणार आहे. तर पेन्शनचा 50 टक्के पगार हा कुटुंबियांना मिळणार आहे. नुकतेच यासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील नियमात बदल करण्यात आले आहेत.
नव्या नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना किंवा नातेवाईकांना निवृत्तीवेतनासाठी 7 वर्ष सेवा देण्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता जर 7 वर्षाची सेवा पूर्ण होण्यापूर्वी एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर पेन्शन पैकी 50 टक्के रक्कम कर्मचार्याच्या कुटुंबाला दिली जाईल.
म्हणजेच आता सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या काही पेन्शनच्या अटी रद्द करण्यात आल्या आहेत. पूर्वी बऱ्याच घटनांमध्ये या अटीमुळे कुटुंबातील सदस्यांना पेन्शनचा लाभ मिळू शकला नव्हता. त्यामुळे आता नव्या नियमानुसार हा लाभ 50 टक्के मिळणार आहे.
सरकारनं वाढवला महागाई भत्ता
बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. 17 टक्क्यांवरून हा 28 टक्क्यांवर आणल्यानं कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हा महागाई भत्ता 1 जुलैपासून लागू करण्यात आला. सरकारी कर्मचाऱ्यांसोबत आता पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे.
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार फायदा
कोरोनाच्या संकटात वित्त मंत्रालयाने एप्रिल 2020 मध्ये केंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचारी आणि 61 लाख निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यातील वाढ थांबविण्याचा निर्णय घेतला होता. 30 जून 2021 पर्यंत त्यांना डीएचा लाभ मिळालेला नाही. आता सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे सुमारे 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार. यामुळे सरकारच्या खर्चात सुमारे 34,401 कोटी रुपयांची वाढ होणार आहे.
(साभार-झी न्यूज)