बीड

बीड जिल्ह्यातील या तीन तालुक्यात निर्बन्ध कडक:दुकानाच्या वेळा केल्या कमी

कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून या कार्यालयाचे आदेश क्र.14 अन्वये बीड जिल्ह्यात दिनांक 15/06/2021 रोजी पर्यंत निर्बंध वाढविण्यात आलेले होते. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचेकडील No. DMU2020/CR.92/DisM-1, दिनांक 04/06/2021 रोजीच्या संदर्भ क्र. 15 च्या आदेशान्वये राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता निर्बंधाच्या कालावधी मध्ये राज्यातील वेगवेगळ्या विभागातील कोव्हीड-19 ची परिस्थिती लक्षात घेता राज्यात कोरोना मुळे लावण्यात आलेल्या निबंधांवर शिथीलता येत असून राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 स्तर ठरविले आहेत. त्या त्या स्तरानुसार संबधित जिल्हयांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. प्रकरणात संदर्भ क्र.15 च्या मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार राज्य शासनाने वर्गीकरण केलेले आहे व संदर्भ क्र.15 च्या मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास संभाव्य तिसरी लाट रोखण्याच्या अनुषंगाने आवश्यक दिशानिर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने या कार्यालयाचे संदर्भिय आदेश क्र. 16 नुसार आपणास या पुर्वीच आवश्यक दिशानिर्देश प्रदान करण्यात आलेले आहेत. परंतु जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन प्राप्त होणारे दैनिक अहवालांचे अवलोकन
केले असता, जिल्हयातील आष्टी, पाटोदा व गेवराई तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या लक्षणीयरित्या कमी होत नसल्याचे दिसुन येते. या परिस्थितीचा विचार करता, जिल्हयामधील आष्टी, पाटोदा व गेवराई तालुक्यांमध्ये कोवीड-19 विषाणूचा प्रार्दुभाव त्वरित ओटाक्यात आणणे आवश्यक आहे. कोवीड-19 विषाणूच्या तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता संभाव्य रुग्ण संख्या व उपलब्ध वैद्यकीय संसाधनांचा विचार करता, रुग्ण संख्या नियंत्रित करणे हे अत्यंत आवश्यक आहे त्या अनुषंगाने विविध यंत्रणांना खालीलप्रमाणे आदेशित करण्यात येत आहे-

  1. बीड जिल्हयातील आष्टी, गेवराई, पाटोदा या तालुक्यांमध्ये ग्रामीण व शहरी भागात आवश्यक
    सेवांच्या पुरवठा संबधित आस्थापना उघडण्याचा कालावधी प्रत्येक दिवशी सोमवार ते रविवार
    सकाळी 07.00 ते दुपारी 12.30 वा. पर्यंत असेल.
  2. बीड जिल्हयातील आष्टी, गेवराई, पाटोदा या तालुक्यांमध्ये ग्रामीण व शहरी भागात सोमवार ते
    शुक्रवार आवश्यक सेवे व्यतिरिक्त इतर आस्थापना उघडण्याचा कालावधी (सोमवार ते शुक्रवार) सकाळी 07.00 ते दुपारी 12.30 वा. पर्यंत असेल. शनिवार व रविवार या दिवशी आवश्यक सेवांच्या पुरवठा संबधित आस्थापना वगळता इतर सर्व आस्थापना पुर्ण पणे बंद राहतील.
  3. वरील तालुक्यांमधील सर्व आस्थापनां पैकी जसे की, हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स सेवा, व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर इ. आस्थापनाधारकांना या कार्यालयाचे आदेश क्र.2021/आरबीडेस्क-1/पोल-1/कावि-फौप्रसंक144 दिनांक 05.06.2021 मधील नमुद निबंध वरील कालावधीमध्ये लागु राहतील.
  4. आष्टी, पाटोदा व गेवराई तालुक्यांमध्ये सकाळी 07.00 वा. ते दुपारी 12.30. वाजेपर्यंतची आस्थापना सुरु ठेवण्याची सुधारित वेळ लक्षात घेता, दुपारी 01.00 वाजेनंतर केवळ अत्यावश्क कारणांव्यतिरिक्त (उदा. परगावी प्रवास, वैद्यकीय सेवा इ.) हालचाल व शहरातंर्गत अथवा गावांतर्गत प्रवासास परवानगी असणार
    नाही.
  5. उक्त वेळे व्यतिरिक्त विना कारण घराबाहेर पडल्याचे निर्दशनास आल्यास, संबधिता विरुध्द आपत्ती व्यपस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही अनुसरण्यात येईल.
  6. संबधित कायक्षेत्रातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उप विभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी नगर पालिका / नगर पंचायत, पोलीस निरिक्ष्क स्थानिक पोलीस स्टेशन, यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सदरील
    आदेशाची अंमलबजावणी काटेकोर पणे पुर्ण करावी.
  7. शहरांमधील विशिष्ट ठिकाणी अथवा विशिष्ट गाव / वाडी ठिकाणी मोठया प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याचे निर्दशनास आल्यास अशी शहरी भागांमधील ठिकाणे | गावे | वाडी कंटेन्मेंट झोन (Containment Zone) घोषित करण्याबाबतची दक्षता स्थानिक अधिकारी यांनी घ्यावी तसेच (Containment Zone) ची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने स्थानिक कर्मचारी यांनी कार्य करावे, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी याबाबत स्थळ पाहणी करावी.
  8. सद्यस्थितीत जिल्हयात कोवीड-19 बाधित असलेल्या रुग्णांकरिता गृह विलगीकरण (Home Isolation) ची परवानगी पुर्णत: बंद असल्याने ज्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या/ कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड बाधित रुग्ण गृह विलगीकरणात आढळुन येतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही अनुसरण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  9. बाजारपेठांमध्ये विना मास्क फिरणारे नागरिक तसेच विहित कालावधी नंतरही आस्थापना सुरु ठेवणारे व्यवसायिक यांच्यावर दंडात्मक कार्यवाही अनुसरण्यात यावी जेणेकरुन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे पुर्ण होईल.
  10. शनिवार व रविवार या दिवसांमध्ये आवश्यक सेवे व्यतिरिक्त इतर आस्थापना सुरु राहणार नाहीत याची दक्षता सर्व तहसिलदार यांनी घ्यावी या करिता कार्यक्षेत्रातील उप विभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी, नगर पालिका | नगर पंचायत व गट विकास अधिकारी यांच्या सोबत दररोज आढावा घ्यावा आणि सर्व तहसिलदार यांनी याबाबत सर्व संबधित विभागासोबत समन्वय ठेवुन कामकाज करावे. दंडात्मक कार्यवाही प्राधान्याने आणि परिणामकारक असावी.
  11. निबंधाचा कालावधी लक्षात घेता, नियंत्रक अधिकारी यांनी शेती विषयक कामे व पीक कर्ज विषयक कामे बाधित होणार नाहीत याबाबत दक्षता घेवुन विवेकाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे.
  12. सदर आदेशानुसार करण्यात आलेले बदल हे औद्योगिक क्षेत्रास प्रभावित करणार नाहीत. उद्योगांना यापुर्वीच्या वेळोवेळी निर्गमित आदेशांमधील नियम व निबंध पुर्वीप्रमाणे लागू राहतील.
  13. जिल्हयातील इतर तालुक्यांमधील क्षेत्रीय अधिकारी यांनी देखील सद्यस्थितीत त्यांच्या तालुक्यांमध्ये रुग्ण संख्या आटोक्यात असली तरी, गाफिल न राहता या कार्यालयाचे वेळोवेळी प्रदान करण्यात आलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे.

सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबधित विभागांची राहील. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल. सदरचे आदेश दिनांक 19.07.2021 (सकाळी 07.00 वाजेपासुन) ते 28.07.2021 (सकाळी 07.00 वाजेपर्यंत) संबंधित कार्यक्षेत्रात लागु राहतील आई आदेश आज जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *