बीड जिल्ह्यात आज 181 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 8010 तर देशात 38949 बाधीत
बीड जिल्ह्यात आज 181 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 8010 बाधीत
बीड जिल्ह्यात आज दि 16 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4187 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 181 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4006 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 49 बीड 24 धारूर 6 गेवराई 17 केज 10 माजलगाव 10 परळी 2 पाटोदा 32 शिरूर 17 वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात आज ८ हजार ०१० नवीन रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ८ हजार ०१० नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले असून कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत किंचित घट झाल्याचे दिसत आहे. काल ८ हजार ६०२ रुग्णांचे निदान झाले होते. तर, आज एकूण ७ हजार ३९१ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज एकूण १७० रुग्णांनी प्राण गमावले आहेत. (maharashtra registered 8010 new cases in a day with 7391 patients recovered and 170 deaths today)
आजच्या १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१७ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०७ हजार २०५ इतकी झाली आहे.
देशात 38 हजार 949 नव्या कोरोनोबाधित रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासांत देशात 38 हजार 949 नव्या कोरोनोबाधित रुग्णांची नोंद झाली, तर 40 हजार 026 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत देशात 542 लोकांना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला. आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
भारतात आतापर्यंत 3 कोटी 10 लाख 26 हजार 829 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3 कोटी 01 लाख 83 हजार 876 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सध्या कोरोनाचे 4 लाख 30 हजार 422 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना विषाणूने देशातील 4 लाख 12 हजार 531 लोकांचा आतापर्यंत जीव घेतला आहे. देशातील रिकव्हरी रेट 97.28 टक्के झाला आहे. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या 1.39 टक्के आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)