बीड जिल्ह्यात आज 143 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 6067 तर देशात 41 हजार कोरोनामुक्त
बीड जिल्ह्यात आज दि 15 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4398 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 143 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4255 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 37 बीड 23 धारूर 9 गेवराई 14 केज 9 माजलगाव 4 परळी 4 पाटोदा 31 शिरूर 4 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात ८ हजार ६०२ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ८ हजार ६०२ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले असून कालच्या तुलनेत रुग्णसंख्येत किंचित वाढ झाल्याचे दिसत आहे. तर, आज एकूण ६ हजार ०६७ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज एकूण १७० रुग्णांनी प्राण गमावले आहेत. (maharashtra registered 8602 new cases in a day with 6067 patients recovered and 170 deaths today)
कालच्या १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ४४ हजार ८०१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१७ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०६ हजार ७६४ इतकी झाली आहे.
Coronavirus: देशात एका दिवसात ४१ हजार रुग्ण करोनामुक्त
देशातली करोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरु लागली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार करोनाची लाट सौम्य होताना दिसत आहे. दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून नवबाधितांची संख्या घटत आहे.
देशात काल दिवसभरात ३८ हजार ७९२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख २९ हजार ९४६ वर पोहोचली आहे. तर काल ४१ हजार करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आता बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या तीन कोटी १ लाख ४ हजार ७२० वर पोहोचली आहे. देशातला करोना रुग्ण बरे होण्याचा दर मात्र स्थिर आहे. आजही हा दर ९७.२८ टक्के इतका आहे.
तर देशात काल दिवसभरात ६२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत मृत्यू पावलेल्या करोनारुग्णांची संख्या ४ लाख ११ हजार ४०८ वर पोहोचली आहे. तर देशाचा करोना मृत्यूदर आता १.३३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)