बीड जिल्ह्यात 104 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात आणि देशात पहा रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 5 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2166 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 104 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2062 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 24 बीड 19 धारूर 3 गेवराई 14 केज 8 परळी 1 पाटोदा 12 शिरूर 16 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत
दिवसभरात ९ हजार ३३६ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात करोनाची साथ नियंत्रणात येत असताना दैनंदिन करोना बाधितांचा आकडा अपेक्षित प्रमाणात कमी होत नसल्याने चिंता अजूनही कायम आहे. त्यात काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट पाहायला मिळाली.तर दिवसभरात राज्यात ९ हजार ३३६ नवीन रुग्णांची भर पडली तर त्याचवेळी ३ हजार ३७८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहचले होते. ते पुन्हा एकदा ९५.९१ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
राज्यातील करोनाची आजची स्थिती:
- राज्यात काल १२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा.
- 24 तासात राज्यात ९,३३६ नवीन रुग्णांचे निदान. तर ३,३७८ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
- आजपर्यंत एकूण ५८,४८,६९३ रुग्णांची करोनावर मात. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९१ % एवढे.
- राज्यात करोनाचे सध्या १ लाख २३ हजार २२५ सक्रिय रुग्ण.
देशात रविवारी ३९ हजार ७९६ करोनाबाधित रुग्ण
नवी दिल्ली : आज (सोमवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात रविवारी (४ जुलै २०२१) ३९ हजार ७९६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०५ लाख ८५ हजार २२९ वर पोहचलीय.
दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ७२३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ०२ हजार ७२८ वर पोहचलीय.
रविवारी ४२ हजार ३५२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ९७ लाख ०० हजार ४३० वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ८२ हजार ०७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी ०५ लाख ८५ हजार २२९
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ९७ लाख ०० हजार ४३०
उपचार सुरू : ४ लाख ८२ हजार ०७१
एकूण मृत्यू : ४ लाख ०२ हजार ७२८