महाराष्ट्रमुंबई

बारावी निकालाचा फार्मूला ठरला:असे होईल मूल्यमापन

राज्यातील बारावीच्या परीक्षेच्या निकालाचा फॉर्म्युला अखेर ठरलाय. बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्यात येणार आहे. सीबीएसई प्रमाणेच हा फॉर्म्युला असणार आहे. दहावीसाठी 30 टक्के, अकरावीसाठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के या सूत्रानुसार विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळं बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे.

बारावी बोर्डाचा निकाल दहावी, अकरावी आणि बारावी या तीन वर्गांतील गुणांच्या आधारावर तयार केला जाणार आहे. बारावीच्या घटक, सत्र आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

तसेच दहावी, अकरावी आणि बारावीचे 30:40:40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचे निकष काय असतील? याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळातर्फे (SCERT) निकष तयार करण्यात आले आहे.

बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला जरी जाहीर केला असला तरी बारावीच्या परीक्षेच्या आधारे मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षा कोणत्या गुणांच्या आधारे होणार हे अद्याप अस्पष्ट आहे. देशभरात निकालाचा एकच पॅटर्न असावा अशी मागणी होत असते. बहुतांश राज्यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

असे होईल मूल्यमापन

  • दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%)
  • अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%)
  • बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (30%)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *