बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी लागणार पाच वर्ष:आणखी एक हजार कोटींची गरज
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा असलेल्या बीड रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी अनेक अडचणी अजून पार कराव्या लागणार आहेत ही सर्व कामे पूर्ण होऊन प्रत्यक्षात बीड करांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तब्बल पाच वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे
परळी बीड अहमदनगर या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी बीडच्या स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्यासह अनेकांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत रेल्वे कृती समितीचे ज्येष्ठ पत्रकार नामदेवराव क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे
मध्यंतरी लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीडच्या रेल्वेमार्गाचा प्रश्न पूर्ण करू असे आश्वासन दिले होते त्यानंतर केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रेल्वेमार्गासाठी एकूण रकमेच्या 50 टक्के रक्कम राज्य सरकार देईल असे हमीपत्र केंद्राला दिले आणि या रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले प्रत्यक्षात या रेल्वेमार्गाच्या कामासाठी नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे मात्र बीडच्या जनतेला अजूनही समजलेले नाही सुरुवातीच्या काळात या रेल्वेमार्गासाठी 800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली नंतर 2010 साली या मार्गासाठी 1400 कोटी रुपये लागतील असा प्रस्ताव तयार करण्यात आला त्यानंतर 2012 ला 2800 कोटी रुपये बजेट लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली त्यानुसार या 2800 कोटी रुपयांमध्ये तत्कालीन व आजच्या राज्य सरकारने आत्तापर्यंत 1200 कोटी रुपये दिले असल्याचे सांगण्यात आले तर केंद्र सरकारने 1300 कोटी रुपये दिले असल्याचे सांगण्यात आले आहे मात्र प्रत्यक्षात केंद्र सरकारने नेमकी किती रक्कम या रेल्वेमार्गासाठी दिली हे मात्र गुलदस्त्यात आहे,याबाबत रेल्वेचे अधिकारी निश्चित माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत, 2012 साली ठरलेले एकूण बजेट आता 2021 आली किती लागेल? याचा अंदाज घेतला असता या या कामासाठी 3 हजार 800 कोटी रुपये लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर केंद्र आणि राज्य सरकारने 2500 कोटी रुपये दिले असतील तर हे काम अद्याप पूर्ण का झाले नाही याबाबत मात्र रेल्वेचे अधिकारी कुठलाही खुलासा करायला तयार नाही याबाबत माहिती घेतली असता आजही या मार्गाच्या जमीन संपादनाचे काम चालू असून बीडच्या रेल्वेस्थानकाच्या जागेचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही यासाठी तीनशे पन्नास एकर जमिनीची गरज असून त्यापैकी 200 एकर जमिन संपादित झाली असल्याचे समजले आहे 2012 साली हे बजेट ठरवण्यात आले होते त्यापैकी केंद्राने जर ही रक्कम पूर्ण दिली असती तर आज या मार्गाचे काम पूर्ण झाले असते मात्र सध्या परिस्थिती या मार्गालगत अनेक पुलाचे काम बाकी असून रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जमीन संपादनाची गरज आहे हे काम देखील चालू आहे असे सांगण्यात आले आहे एकूण 260 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग असून या मार्गाचे संपूर्ण मातीकाम झाले असून अहमदनगर ते कुंटेफळ पर्यंत जवळपास 26 ते 30 किलो मीटर चे काम पूर्ण झाले असून त्याची टेस्टिंग देखील झाली आहे, केंद्र आणि राज्य सरकारच्या इच्छाशक्ती वरच हे काम आता अवलंबून असून 2023 सालापर्यंत अहमदनगर ते बीड हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर 2025 पर्यंत या मार्गाचे संपूर्ण काम होईल असे जाणकारांनी सांगितले आहे याचाच अर्थ बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणखी पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे हे काम जर जलद गतीने करायचे असेल तर आणखी एक हजार कोटींची गरज असून यासाठी जनतेने आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन ही मागणी लावून धरली तरच हा प्रश्न सुटू शकतो सध्या या रेल्वे मार्गासाठी शंभर कोटी रुपये केंद्र सरकारने दिले असून उर्वरित रक्कम जोपर्यंत मिळत नाही पुलाचे काम जोपर्यंत होत नाही आणि जमीन संपादनाचे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बीडची रेल्वे रूळावरून धावू शकणार नाही हे मात्र तितकेच सत्य आहे