बीड

बीड जिल्ह्यात आज 170 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 6727 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 29 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3561 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 170 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3391 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 8 आष्टी 64 बीड 19 धारूर 3 गेवराई 18 केज 11 माजलगाव 7 परळी 2,पाटोदा 14 शिरूर 12 वडवणी 12 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात 6727 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात मागील दोन दिवस कोरोनाची रुग्णसंख्या काहीशी वाढली होती. मात्र राज्यात रुग्णसंख्या तीन हजारने कमी झाली आहे. राज्यात काल 6727 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 812 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 58 लाख 925 रुणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 95.99 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 17 हजार 864 अॅक्टिव रुग्ण आहेत.

राज्यात काल 101 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढाआहे.

10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेले जिल्हे

मुंबई- 12 हजार 446

ठाणे – 16 हजार 141

पुणे- 17 हजार 42

कोल्हापूर- 10 हजार 875

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *