बीड

बीड जिल्ह्यात आज 148 पॉझिटिव्ह रुग्ण:परळी निरंक तर राज्यात ८,४७० नव्या रुग्णांचे निदान

बीड जिल्ह्यात आज दि 23 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4183 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 148 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4035 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 13 आष्टी 22 बीड 22 धारूर 4 गेवराई 28 केज 14 माजलगाव 5 पाटोदा 16 शिरूर 17 वडवणी 7 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात ८,४७० नव्या रुग्णांचे निदान; ९,०४३ झाले बरे

मुंबई: राज्यात काल दिवसभरात ८ हजार ४७० नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याबरोबरच एकूण ९ हजार ०४३ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, दिवसभरात १८८ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या १८८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५७ लाख ४२ हजार २५८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०९ टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २३ हजार ३४० इतकी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *