बीड

बीड जिल्ह्यात आज फक्त 147 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात कोरोना ओसरू लागला

बीड जिल्ह्यात आज दि 22 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2917 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 147 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2770 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 12 आष्टी 29 बीड 31 धारूर 6 गेवराई 13 केज 11 माजलगाव 7 परळी 3 पाटोदा 14 शिरूर 15 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात कोरोना ओसरू लागला

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता काहीसा ओसरताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या जास्त आहे. राज्यात आजही कोरोनाबाधितांपेक्षा अधिक रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, राज्याचा रिकव्हरी रेट देखील वाढला आहे. राज्यात आज 6,270 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13,758 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मृत्यूची संख्याही आज शंभरच्या खाली आहे. आज 94 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

राज्यातील रुग्ण बरं होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.89 टक्के इतका झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *