बीड

बीड जिल्ह्यात आकडा वाढला:173 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 9 हजार बाधीत

बीड जिल्ह्यात आज दि 19 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4579 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 173 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4406 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 11 आष्टी 41 बीड 30 धारूर 12 गेवराई 13 केज 18 माजलगाव 11 परळी 4 पाटोदा 13 शिरूर 17 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत.

दिवसभरात ९ हजार ७९८ नवीन रुग्णांचे निदान.

मुंबई: राज्यात करोना संसर्गाच्या दैनंदिन आकडेवारीत चढउतार कायम असून आज कालच्यापेक्षा उलट चित्र पाहायला मिळाले. आज नवीन बाधितांच्या तुलनेत करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या मोठी राहिली. गेल्या २४ तासांत राज्यात ९ हजार ७९८ नवीन रुग्णांचे निदान झाले तर त्याचवेळी १४ हजार ३४७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. करोनाच्या विळख्यात सापडलेले आणखी १९८ रुग्ण आज दगावले. ( Coronavirus In Maharashtra Latest Update )

राज्यातील आजची स्थिती

  • आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ % एवढा आहे.
  • गेल्या २४ तासांत ९ हजार ७९८ नवीन रुग्णांचे निदान तर १४ हजार ३४७ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५६,९९,९८३ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यशस्वी.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७३% एवढे झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *