बीड जिल्हा तिसऱ्या स्तरात:जिल्हाधिकारी यांचे आदेश:उद्यापासून कोणते नियम
कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून या कार्यालयाचे आदेश क्र.14 अन्वये बीड जिल्ह्यात दिनांक 15/06/2021 रोजी पर्यंत निर्बंध वाढविण्यात आलेले होते.
04/06/2021 रोजीच्या संदर्भ क्र.15 च्या आदेशान्वये राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता निबंधाच्या कालावधी मध्ये राज्यातील वेगवेगळ्या विभागातील कोव्हीड-19 ची परिस्थिती लक्षात घेता राज्यात कोरोना मुळे लावण्यात आलेल्या निबंधांवर शिथीलता येत असून राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 स्तर ठरविले आहेत. त्या त्या स्तरानुसार संबधित जिल्हयांमध्ये निबंध शिथील करण्यात आलेले आहेत.
ज्या अर्थी संदर्भ क्र.15 च्या मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार राज्य शासनाने वर्गीकरण केलेले आहे. आणि ज्याअर्थी बीड जिल्हयामध्ये कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 7.11% असुन, व्यापलेल्या ऑक्सीजन बेड्सची टक्केवारी 11.97 % इतकी असल्याने बीड जिल्हा महाराष्ट्र शासनाचे संदर्भ क्र. 15 अन्वये घोषित करण्यात आलेल्या तिसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे.
त्या अर्थी बीड जिल्हयात कोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखणेसाठी लागु असलेले या कार्यालयाचे संदर्भिय आदेश क्र 16 दिनांक 05.06.2021 मधील निरबंध बीड जिल्हयात दिनांक 18.06.2021 रोजी पासून शासनाकडील पुढील आदेशापर्यंत लागु राहतील. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबधित विभागांची राहील. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल. सदरचे आदेश आज दि.18.06.2021 रोजी रविंद्र जगताप जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बीड यांनी काढले आहेत