बीड

बीड जिल्ह्यात156 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात चढउतार देशात संक्रमण दर स्थिर

बीड जिल्ह्यात आज दि 18 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4483 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 156 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4327 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 10 आष्टी 27 बीड 40 धारूर 4 गेवराई 12 केज 17 माजलगाव 3 परळी 11 पाटोदा 17 शिरूर 7 वडवणी 8 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात करोनाचा चढउतार कायम;आज करोनामुक्तांची संख्या घटली

मुंबई: राज्यात नवीन करोना बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या आज कमी राहिली. २४ तासांत ९ हजार ८३० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर त्याचवेळी ५ हजार ८९० रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. आज आणखी २३६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून राज्यातील मृतांचा एकूण आकडा १ लाख १६ हजार २६ इतका झाला आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Update )

राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. स्थिती सध्या बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. नवीन करोना बाधित आणि करोनातून बरे होणारे रुग्ण यांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत असला तरी त्यात फार मोठा फरक नसल्याचे दिसत आहे. आजच्या आकडेवारीचा विचार केल्यास करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत आज कमी राहिली. बुधवारी १० हजार ५६७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले होते तर आज ही संख्या ५ हजार ८९० पर्यंत खाली आली. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या १ लाख ३९ हजार ९६० इतकी आहे

करोनाची राज्यातील आजची स्थिती:

  • राज्यात आज २३६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील करोना मृत्यूदर १.९५ टक्के एवढा.
  • २४ तासांत राज्यात ९ हजार ८३० नवीन रुग्णांचे निदान.
  • दिवसभरात ५ हजार ८९० रुग्ण बरे होऊन परतले घरी.
  • आजपर्यंत एकूण ५६,८५,६३६ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९५.६४ % एवढे.

देशाचा ‘संक्रमण दर’ स्थिर,

नवी दिल्ली : भारतात तब्बल ७३ दिवसांनंतर उपचार सुरू असणाऱ्या करोना संक्रमित रुग्णांची संख्या ८ लाखांहून खाली घसरलेली दिसतेय. एका दिवसातील जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशाचा संक्रमण दर ३.२४ टक्क्यांवर आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलीय.
शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी (१७ जून २०२१) ६२ हजार ४८० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे १५८७ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आला. गुरुवारी ८८ हजार ९७७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय.
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ९७ लाख ६२ हजार ७९३ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ८५ लाख ८० हजार ६४७ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या ७ लाख ९८ हजार ६५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ८३ हजार ४९० वर पोहचलीय.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ९७ लाख ६२ हजार ७९३
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ८५ लाख ८० हजार ६४७
उपचार सुरू : ७ लाख ९८ हजार ६५६
एकूण मृत्यू : ३ लाख ८३ हजार ४९०
करोना लसीचे डोस दिले गेले : २६ कोटी ८९ लाख ६० हजार ३९९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *