मतदार यादीत दुरुस्ती करायची असेल तर लवकर करा:अन्यथा नावे वगळ्यात येणार
मतदार यादी पुर्ननिरीक्षणबाबत आवाहन
बीड- बीड जिल्हयाअंतर्गत 288-गेवराई, 230-बीड, 232-केज विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी शुद्धीकरण चालु आहे. यामध्ये फोटो नसलेल्या मतदारांची फोटो जमा करणे,दुबार नावे वगळणे, तांत्रिक चुका दुर करणे इत्यादी मतदार यादी विषयक काम चालु आहे तसेच ज्या मतदारांची नाव दुबार आहेत त्यांनी देखील आपले एकापेक्षा अधिक असलेली नावे वगळण्याबाबत फॉर्म नं.सात भरून देण्यात यावा. बीड तालुका अंतर्गत मतदार यादीतील ज्या मतदारांचे फोटो यादीत नाहीत अशा मतदारांची यादी
www.beed.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .सदर छायाचित्र नसलेली मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची शक्यता असल्याने याबाबत संबंधितांनी तात्काळ दिनांक 21 जुन 2021 पूर्वी तहसील कार्यालय बीड येथील निवडणुक शाखेत किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (B.L.0.) च्याकडे फोटो जमा करावेत.असे आवाहन नामदेव टिळेकर, मतदार नोंदणी अधिकारी, तथा उपविभागीय अधिकारी,बीड व शिरीष वमने, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, तथा तहसीलदार बीड यांनी केले आहे.