बीड

बीड जिल्ह्यात आज 157 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात आणि देशात रुग्णसंख्या घटू लागली

बीड जिल्ह्यात आज दि 15 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2620 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 157 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2463 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 7 आष्टी 37 बीड 23 धारूर 4 गेवराई 13 केज 28 माजलगाव 9 परळी 14 पाटोदा 3 शिरूर 8 वडवणी 11 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात रुग्णसंख्येत मोठी घट; ८,१२९ नवे रुग्ण

मुंबई: राज्यात नव्या करोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात ८ हजार १२९ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याबरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज निदान झालेल्या रुग्ण संख्येहून अधिकच आहे. एकूण १४ हजार ७३२ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, काल दिवसभरात २०० करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या २०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.९ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ५४ हजार ००३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ३५४ इतकी झाली आहे.

देशातही रुग्णसंख्या घटली

भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ७०,४२१ रुग्ण आढळून आले आहेत, तर ३,९२१ जणांचा मृत्यू झाला. गेल्या ७४ दिवसांत एवढे कमी रुग्ण प्रथमच आढळले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या २,९५,१०,४१० इतकी झाली आहे.

मागील २४ तासांत १,१९,५०१ रुग्ण कोरोनाच्या आजारातून पूर्ण बरे झाले. देशात पूर्ण बरे झालेल्यांची एकूण संख्या २,८१,६२,९४७ इतकी झाली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, ही समाधानाची बाब आहे. ६ मे रोजी कोरोनाचे सर्वाधिक ४ लाख १४ हजार नवे रुग्ण आढळले होते.

देशात आता एकूण रुग्णांची संख्या दोन कोटी ९५ लाख १० हजार ४१० झाली, दोन महिन्यांनंतर उपचाराधीन रुग्णांची संख्या ९ लाख ७३ हजार १५८ तर एकूण मृत्यूंची संख्या ३,७४,३०५ झाली.
उपचाराधीन रुग्णांची संख्या ३.३० टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर ९५.४३ टक्के एवढा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *