बीड जिल्ह्यात आज 108 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 10 हजार तर देशात 84 हजार रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 13 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2451 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 108 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2343 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 9 आष्टी 27 बीड 13 धारूर 4 गेवराई 1 केज 24 माजलगाव 6 परळी 4 पाटोदा 4 शिरूर 8 वडवणी 8 असे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात १० हजार ६९७ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात काल दिवसभरात १० हजार ६९७ नव्या करोना (Coronavirus) बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याबरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या निदान झालेल्या रुग्ण संख्येहून अधिकच आहे. काल एकूण १४ हजार ९१० इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, दिवसभरात ३६० करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या ३६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.८४ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ३१ हजार ७६७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४८ टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५५ हजार ४७४ इतकी झाली आहे.
देशात 84,332 इतकी नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली – देशात मागील 24 तासात 84,332 इतकी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आता सलग 5 व्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद 1 लाखांपेक्षा कमी झाली आहे. सक्रीय रुग्णसंख्येत सातत्याने घसरण होत आहे. सध्या देशातील सक्रीय रुग्णसंख्या 10,80,690 इतकी आहे. सलग बाराव्या दिवशी ती 20 लाखांपेक्षा कमी आहे.
मागील 24 तासांत रुग्णसंख्येत एकूण 40,981 ने घट झाली आणि देशाच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती केवळ 3.68 टक्के इतकी आहे.
कोविड संसर्गातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत आहेत. देशात सलग 30 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मागील 24 तासात 1,21,311 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत 36,979 आणखी रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले आहेत.
कोविड 19 संसर्ग झालेल्यांपैकी 2,79,11,384 लोक बरे झाले आहेत. तर मागील 24 तासात 1,21,311 रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे होणाऱ्यांचा कल वाढता असून बरे होण्याचा एकूण दर 95.07 % वर पोहोचला आहे