बीड जिल्ह्यात आज 180 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात कमी जास्त तर देशात मृत्यूचा आकडा वाढला
बीड जिल्ह्यात आज दि 12 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2939 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 180 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2759 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 37 बीड 24 धारूर 7 गेवराई 17, केज 48 माजलगाव 7 परळी 3 पाटोदा 19 शिरूर 10 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी-जास्त
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी-जास्त होताना दिसतेय. गुरूवारी राज्यात
१२ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या तुलनेने शुक्रवारी कोरोना बाधितांची संख्या घटल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी ११ हजारांहून अधिक नव्या रूग्णांचे निदान झाले तर ४०६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, शुक्रवारी राज्यात ११,७६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,८७,८५३ झाली आहे. यासह शुक्रवारी ८,१०४ रुग्ण बरे होऊन त्यांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,१६,८५७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४ टक्के एवढे झाले आहे. यासह सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के इतका आहे.
देशात ३,४०३ करोनामृत्यूंची नोंद, तर ९१,७०२ नवे रुग्ण
देशातला करोनाचा कहर हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली रुग्णसंख्या कालपासून पुन्हा वाढलेली दिसत आहे. त्याचबरोबर मृतांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे देशवासीयांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ९१ हजार ७०२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ११ लाख २१ हजार ६७१वर पोहोचली आहे.
देशात काल दिवसभरात एक लाख ३४ हजार ५८० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातल्या करोनामुक्तांची एकूण संख्या दोन कोटी ७७ लाख ९० हजार ७३ वर पोहोचली आहे.
देशात गेल्या २४ तासांत ३,४०३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता तीन लाख ६३ हजार ७९ वर पोहोचली आहे. तर देशातला मृत्यूदर १.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे.