आरटीओत वाहन चाचणी न देताच चालकाला लायसन्स
मुंबई : आरटीओत वाहन चाचणी न देताच चालकाला लायसन्स (अनुज्ञप्ती) मिळणे शक्य होणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने नुकतीच याबाबत अधिसूचना काढली आहे.
या अधिसूचनेनुसार एखादी संस्था, कं पनी, कं त्राटदारांकडून अद्ययावत असे नवीन चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करताना अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे. यामधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या चालकाला प्रमाणपत्र मिळेल आणि ते सादर के ल्यानंतर आरटीओकडून थेट लायसन्स मिळणार आहे. कु शल वाहन चालक मिळावे आणि अपघातही कमी व्हावे हा त्यामार्गील उद्देश आहे.
सध्या राज्यात शासन मान्यतेनुसार मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चालकाला २१ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. यातून बाहेर पडलेला चालक आरटीओत प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सादर करतो. त्यानंतर सर्व कागदपत्र पूर्ततेनंतर आरटीओकडून त्याची चाचणी घेतली जाते व त्यानंतर लायसन्स मिळते. पक्के लायसन्स मिळवण्याआधी शिकाऊ लायसन्स मिळवणे मात्र गरजेचे असते. परंतु यातून कु शल चालक मिळतीलच असे नाही. त्यामुळे रस्ते वाहतूक मंत्रालयाने अद्ययावत असे चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची मसुदा अधिसूचना फे ब्रुवारी २०२० मध्ये जारी के ली होती. त्याची अंतिम अधिसूचना ७ जून २०२१ ला रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केली.
अद्ययावत चालक प्रशिक्षण केंद्र उभे राहिल्यानंतर आरटीओकडील अधिकार मात्र कमी होणार आहेत. आरटीओकडून फक्त चालकाला कायमस्वरुपी लायसन्स देण्याचा अधिकार राहिल. वाहन चाचणी घेता येणार नाही.
केंद्रासाठीच्या अटी…
केंद्राच्या अधिसूचनेनुसार चालक प्रशिक्षण केंद्र हे मैदानी परिसरात साधारण एक किं वा दोन एकर जागेत हवे. यामध्ये प्रथम वाहतूक नियम शिकवण्याची साधने हवीत. अवजड आणि हलके वाहन आभासी प्रशिक्षण चाचणी यंत्रणा, स्वतंत्र वाहन चाचणी पथ, संगणक, इत्यादी सुविधा या केंद्रात असणे गरजेचे आहे. या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या चालकाला आरटीओत पुन्हा चाचणी देण्याची गरज लागणार नाही. यासंदर्भात परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, १ जुलै २०२१ पासून अद्ययावत वाहन चालक प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.