बीड

बीड जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू:कधी कुठे आणि कशी मिळणार लस

कोविड-१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार बीड जिल्हयात कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येतआहे.नागरिकांनी दिलेल्या सूचनेनुसार लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे

उपलब्ध लस साठयानुसार स्वा.रा.ती.वै.म.वै.रु.अंबाजोगाई येथे १७९०,जिल्हा रुग्णालय बीड १७३०,उप जिल्हा रुग्णालय गेवराई,परळी, केज येथे प्रत्येकी ९००, ग्रामीण रुग्णालय माजलगाव,धारुर,पाटोदा,आष्टी येथे प्रत्येकी ७००,ग्रामीण रुग्णालय तालखेड ३५०,चिंचवण ४३०,धानोरा ४२० ,नांदुरघाट ३५०,स्त्री रुग्णालय नेकनुर ४१०,प्रा.आ.केंद्र ग्रामीण
(सर्व),नागरी रुग्णालय परळीवै.,अंबाजोगाई पेठ बीड,मोमीनपुरा बीड येथे प्रत्येकी ३८०,पोलीस हॉस्पीटल बीड ३०० या प्रमाणे ३३१३० कोव्हीशिल्ड लसीचे पहिल्या व दुसऱ्या तसेच ५८४० कोव्हॅक्सीन लसीचे फक्त दुसऱ्या डोससाठी जिल्हयात वितरण करण्यात आले
आहे.
• ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या जास्तीत जास्त नागरीकांनी घरबसल्या Ezee app
https://ezee.live/Beed-covid19-registration या लिंकवर अथवा needly app वर कोविड लसीकरणाकरीता नोंदणी करावी.
• जिल्हयात ७३ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु असुन प्राप्त लससाठा व लसीकरणाकरीता
झालेलया नोंदणी नुसार भविष्यात उपकेंद्रांच्या ठिकाणी लसीकरण सत्र सुरु करण्यात येणार
आहेत.एका उपकेंद्राच्या ठिकाणी २०० नागरिकांची नोंदणी झाल्यावर उपकेंद्रस्तरावर लसीकरण
सत्र आयोजीत केले जाईल.तरी ४५ वर्षेवयावरील जास्तीत जास्त नागरिकांनी
लसीकरणाकरिता नोंदणी करुन मेसेज प्राप्त झाल्यावर लसीकरण करुन घ्यावे.
• ४५ वर्षे वयावरील नागरिकांची नोंदणी वाढविणेकरिता गावनिहाय शिक्षकांची नियुक्ती
करण्यात आली आहे.
• ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जास्तीतजास्त नागरीकांनी शिक्षकांमार्फत अथवा स्वतःनोंदणी करुन अपॉइंटमेट नुसार लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले असुन कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांनी अनावश्यक गर्दी टाळावी,कोविड प्रतिबंधक
नियमांचे पालन करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी,अजित कुंभार
जिल्हा परिषद बीड यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *