आजही दिलासा:बीड जिल्ह्यात आज फक्त 265 पॉझिटिव्ह रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 4 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3414 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 265 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3149 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 14 आष्टी 31 बीड 57 धारूर 15 गेवराई 31, केज 33 माजलगाव 19 परळी 5 पाटोदा 15, शिरूर 29 वडवणी 16 असे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात काल 15,229 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात कमी होत असल्याने राज्यात दिलासादायक चित्र आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे रुग्णबाधित रुग्णांपेक्षा अधिक आहे. मागच्या २४ तासात २५ हजार ६१७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर १५ हजार २२९ जणांना करोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ८६ हजार २०६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ९४.७३ टक्के एवढं झालं आहे. राज्यात एका दिवसात ३०७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या २ लाख ४ हजार ९७४ सक्रिय करोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
राज्याचा रिकव्हरी रेट 94.73% इतका आहे. दरम्यान, राज्यात 2,04,974 सक्रीय रुग्ण आहेत.
देशात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत घट
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 34 हजार 154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 2 हजार 887 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 32 हजार 364 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
तर 2 हजार 713 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 7 हजार 71 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
(राज्यातील व देशातील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)